🫀सकाळच्या थंडीमध्ये Heart Attack का वाढतात?
वैज्ञानिक कारणे:
1.थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात (Vasoconstriction)
हृदयाला रक्त पोहोचवणाऱ्या वाहिन्यांमध्ये जागा कमी होते, आणि तेवढाच वेळेस रक्तदाब वाढतो.
2.Platelet stickiness वाढते
रक्त “घट्ट ” होतं, आणि रक्ताचे गाठी (clots) सहज तयार होतात यामुळे sudden blockage होतो.
3.Sympathetic system हाय-अॅक्टिव्ह होतो
Adrenaline वाढल्याने हृदयाचा ठोका वेगाने वाढतो. जास्त मागणी, पण मर्यादित पुरवठा = धोका.
4.रात्रभर झोपेनंतर अचानक उठणे
शरीर पूर्ण थंड असताना उठणं, bathroom मध्ये अचानक effort घेणं , हृदयाला धक्का.
5.सकाळी 4–8 दरम्यान ‘BP Surge’ आणि ‘Heart Rate Dip’ एकत्र येतो .
हे mismatch अनेक cardiac arrests मागे असलेला invisible कारण असतो.
हृदयविकार रोखण्यासाठी 7 अनुभवाधारित सल्ले:
(सामान्य + हृदय रुग्णांसाठी)
1.गरम कपडे, गरम पाणी, शरीर “warm-up” केल्याशिवाय बाहेर जाऊ नका.
2.पहाटेचा व्यायाम चुकवू नका, पण वेळ/पद्धत समजून घ्या , झोपेतून उठताक्षणी व्यायाम करू नका.
3.पाणी कमी पिऊ नका , रक्त concentrate होते थंडीमध्ये.
4.झोपेतून उठताना वाफाळलेलं पाणी आणि सौम्य हालचाली आधी करा.
5.नियमित औषधं, आणि सकाळी ECG/ BP तपासणी cardiac patients साठी mandatory.
6.अचानक चक्कर, धाप लागणं, छातीत जडपणा असल्यास क्षणाचाही विलंब नको.
7.हिवाळ्यात लक्षणं subtle असतात. chest pain नसेल तरी heart attack होऊ शकतो.
❤️🔥 “थंडीने थरार होऊ नये… हृदय सांभाळा.”
हृदय सांभाळणं म्हणजे आजची शौर्यगाथा आहे.
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉
@KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )
#HeartAttackWinter #CardiologistWisdom
#JustForHearts #DrRavindraKulkarni
#EarlyMorningHeartRisk