📍 ठाणे |
राज्याच्या विविध १६ भागांतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज
#शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यात प्रामुख्याने उबाठा सचिव तथा प्रवक्ते डॉक्टर संजय लाखे पाटील, धुळे येथील उबाठा नगरसेवक जितेंद्र जगताप, शहर संघटक विनोद जगताप, धुळ्याचे माजी सभापती वसंत पावरा, मनसे माथाडी उपाध्यक्ष प्रथमेश चव्हाण, अमित जंगम ( रायगड ), गोपीनाथ संसारे, मातंग समाज मुंबई अध्यक्ष विकी जाधव, शमशुद्दीन शेख यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता.
यावेळी शिवसेना सचिव राम रेपाळे, उपनेत्या सुवर्णा करंजे, माजी महापौर दत्ता दळवी, ज्येष्ठ माजी नगरसेवक पांडुरंग पाटील, माजी नगरसेवक एकनाथ भोईर तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Shivsena #EknathShinde #Maharashtra
@Shivsenaofc