देवेंद्र फडणवीस सरकार घोटाळ्यांनी बरबटलेले असून यंत्रणा, न्यायव्यवस्था आणि जनता यांची कोणतीही भीती या निगरगट्ट सरकारला राहिलेली नाही. कोळसा देखील लाजेल असे काळे कारनामे या सरकारचे आहेत. जेंव्हा या सरकारच्या काळ्या कारनाम्यांची श्वेतपत्रिका निघेल तेंव्हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद होईल.
परप्रांतीय दलाल आणि कंत्राटदारांना हाताशी धरून मलिदा खाल्ला जातोय. पुणे, मुंबई, नवी मुंबई आणि गडचिरोली हे या सरकारचे मलिदा खाण्याचे हॉटस्पॉट आहेत. पुण्यात सरकारी जमिनी, मुंबईत SRA च्या जमिनी, नवी मुंबईत वन खात्याच्या जमिनी तर गडचिरोलीत खाणपट्टे… हे या सरकारचे आवडते खाद्य आहे.
सुलतान मिर्झाने ज्या प्रमाणे मुंबई गुंडांमध्ये वाटली होती त्याप्रमाणे तिन्ही पक्षांनी शहरे आणि विभाग वाटून घेतले आहेत. तिन्ही पक्ष भ्रष्टराचाराने बरबटलेले असून एकमेकांना सांभाळून घेत आहेत…
हे सर्व बघता
“करून वोटचोरी
सुरूय महाराष्ट्राची लुटमारी” असंच म्हणावं लागेल.
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
#गुन्हेगारांना_जामीन_नेत्यांना_जमीन #मलिदा_गँग